सुरू झाली सासूबाईंच्या लग्नाची तयारी, हा आहे मुहुर्त

By  
on  

अग्गबाई सासूबाई या मालिकेने मालिका विश्वात नवा ट्रेंड आणला. आता या मालिकेत एक अनोखं वळण येताना दिसत आहे. या मालिकेत आता सनई चौघड्यांची नांदी होताना दिसत आहे. याला कारण आहे आसावरी आणि अभिजीतच्या लग्नाचं. अभिजीत आणि आसावरीचं एकमेकांवर प्रेम होतं. पण गरज होती दत्तांच्या होकाराची. अभिजीतने हरप्रकारे समजावूनही दत्तांना अभिजीत पसंत पडत नाही. पण आसावरी आजारी असताना अभिजीत यांची तडफड दत्तांना कुठेतरी अंतर्मुख करून जाते. 

 

 

‘आधी समाज, नातेवाईक यांचा विचार करत होतो. पण तुझा विचार कधीच केला नाही.’ असं म्हणत दत्तांनी आसावरी आणि अभिजीतच्या लग्नाला मान्यता दिली आहे. आता या दोघांच्या लग्नाचा बार 19 जानेवारीला उडणार हे नक्की झालं आहे.

Recommended

Loading...
Share