ठरलं तर ! देवदत्त नागे आता दिसणार 'डॉक्टर डॉन'च्या भूमिकेत

By  
on  

तानाजी मधील सुर्याजी मालूसरेंच्या दमदार भूमिकेनंतर देवदत्त नागे आता मालिकेतून समोर येण्यास सिद्ध झाला आहे. देवदत्त यापुर्वी देवयानी आणि जय मल्हार मालिकेत दिसला होता. जय मल्हार मालिकेने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती. जय मल्हार या मालिकेतील खंडोबाच्या भूमिकेने तो घरोघरी पोहोचला. 

 

 

आता तो नव्या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्त नागे या मालिकेत  डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. डॉक्टर डॉन असं या नव्या मालिकेचं नाव आहे. झी युवावर ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तो अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. ही जोडी मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहे. देवदत्त 2 वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share