पाहा Photos: ‘नवरी मिळे नव-याला’, झोकात पार पडणार आसावरी-अभिजीतचं लग्न

By  
on  

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत सध्या धमाल सुरु आहे. मालिकेतील प्रत्येकाला कशा ना कशाची घाई आहे. पण ही घाई आहे अभिजीत-आसावरीच्या लग्नाची. प्रेमातील अनंत अडथळे पार करत अखेर दत्ता आजोबांनी या दोघांच्याही लग्नाला परवानगी दिली आहे. 

आसावरी आणि अभिजीत यांची हळुवार प्रेम कहाणी आता एका सुंदर नात्यात बदलणार आहे.

 

अभिजीत आणि आसावरीचं एकमेकांवर प्रेम होतं. पण गरज होती दत्तांच्या होकाराची. अभिजीतने हरप्रकारे समजावूनही दत्तांना अभिजीत पसंत पडत नाही. पण आसावरी आजारी असताना अभिजीत यांची तडफड दत्तांना कुठेतरी अंतर्मुख करून जाते.

त्यामुळेच दत्ता आजोबा या नात्याला मान्यता देतात. या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील. हा लग्नसोहळा 19 जानेवारीला पार पडणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

Photo Courtesy: zee marathi, Nivedita saraf instagram

Recommended

Loading...
Share