By  
on  

ह.म.बने, तु.म.बने मालिकेतून उठवला जाणार कौटुंबिक छळाविरोधात आवाज

अलीकडे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घराबाहेर असो किंवा घरात अनेकदा स्त्रियांना कौटुंबिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आता सोनी मराठीवरील ह.म.बने, तु.म.बने या मालिकेतून यावर भाष्य केलं जाणार आहे. या आगामी भागाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यात आदिती सारंगधर कौटुंबिक अत्याचाराला थारा न देण्याबाबत आवाहन करताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जर तुमच्या आजूबाजूला कोणाचा कौटुंबिक छळ होत असेल तर शांत राहू नका, तो सर्वांसमोर आणा! बने कुटुंबाने सुद्धा त्यासाठी एक पाऊल उचललंय, तर बघायला विसरू नका, ह.म. बने तु.म. बने - विशेष भाग सोम-शनि, रात्री 10 वाजता. फक्त सोनी मराठीवर. #हमबनेतुमबने | #HumBaneTumBane #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati @adsarangdhar @mugdha1209

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

ह.म.बने, तु.म.बने या मालिकेमध्ये अनेकदा सामाजिक विषय हाताळले जातात. त्यामुळे या मालिकेने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्ज्वला जोग, सचिन देशपांडे आणि अजिंक्य जोशी हे कलाकार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive