गुरुनाथ अडकला 'माया'जालात, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री

By  
on  

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत कधी काय घडेला याचा नेम नाही. आता षडयंत्री गुरुनाथने नवा डाव आखला आहे. नेहमीच शनायाच्या मागे-पुढे करणारा गुरुनाथ आता मायाजालात अडकणार आहे. अडकणार आहे कसला, तर चक्क स्वत:ला मुद्दाम या मायाजालात अडकवून घेणार आहे. मायाचा वापर करुन गुरुनाथला पुढे जायचंय. मालिकेत नुकतीच एन्ट्री झालेली ही बोल्ड आणि ब्युटीफुल माया कोण आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ही 'माया'.  

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत माया ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आहे रुचिरा जाधव. तिने अनेक मालिकांमधून कामं केली आहे. रुचिराने आत्तापर्यंत प्रेम हे, बे दुणे दहा, तुझ्यावाचून करमेना, माझे पती सौभाग्यवती तर शुध्द देसी रोमान्स ही वेबसिरीजही तिने केली आहे.

रुचिरा सोशल मिडीयावर नेहमीच असक्रीय असते, तिचे नानाविविध ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते. आता ती साकारत असलेली माया गुरुनाथच्या  जाळ्यात अडकणार का त्यालाच अडकवणार हे मालिकेतील पुढील भागांत पाहणं औत्सुक्याचं ठरेल. एस.बी कंपनीत गुरूला पुढे जाण्यासाठी जी पायरी हवी होती ती कदाचित लवकरच मिळणार...?

Recommended

Loading...
Share