By  
on  

राजस्थानच्या रणात बहरतंय अभिजीत-आसावरीचं प्रेम

‘अग्गबाई सासूबाई’मध्ये आता एक गुलाबी वळण येताना दिसत आहे. अभिजीत-आसावरीच्या लग्नानंतर त्यांच्या नात्याला हळूहळू का होईना नात्याला सुरुवात होत आहे. ही जोडी आता राजस्थानला हनिमूनला गेली आहे. यावेळी अभिजीत-आसावरीच्या नात्यात अवघडलेपणा जाऊन एक सहजता येताना दिसत आहे. यावेळी अभिजीत आसावरीला उंटावर बसण्याचा आग्रह करतात. पण आसावरी नकार देते.

 

 

मग अभिजीत तिला धीर देत उंटावर बसण्यास मदत करतात. या सांमजस्यातून दोघांमध्येही एक नवं नातं बहरताना दिसत आहे. पण बबड्यावर या नात्याचा मात्र चांगला परिणाम होताना दिसत नाही. त्याने या नात्याचा जाब आईला विचारण्याचं ठरवलं आहे. पण एकीकडे आसावरी-अभिजीतमधील नातं मात्र बहरताना दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive