By  
on  

‘सीआयडी’मध्ये मकरंद अनासपुरेंना मिळाली होती ही भूमिका, ‘दोन स्पेशल’ मध्ये सांगितली आठवण

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी नुकतीच ‘दोन स्पेशल’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मकरंद अनासपुरेंनी त्यांच्यासोबत घडलेला धमाल किस्सा सांगितला. शिवाजी साटम यांनी दिग्दर्शक बी.पी सिंग यांना मकरंद उत्तम अभिनेते असल्याबद्द्ल सांगून एक भूमिका देण्यास सुचवलं होतं. मकरंद तिथे भूमिकेसाठी गेले असता. त्यांची शरीरयष्टी पाहून त्यांना सीआयडी ज्युनिअर ऑफिसर ऐवजी सीआयडी ज्युनिअर कॉंन्स्टेबल ची भूमिका दिली.

 

 

हा किस्सा सांगतच अ‍ॅंकर जितेंद्र जोशीला हसू आवरल्याशिवाय राहिलं नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive