इतिहासाच्या माथी लागणार फितुरीचा कलंक, छत्रपती संभाजी राजेंना होणार कैद

By  
on  

महाराष्ट्राच्या इतिहासाचा मोठा भाग फंद फितुरीने व्यापला आहे. अनेक कर्तृत्ववान राजांना फितुरीने नामोहरम केलं आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यालाही फितुरीचं ग्रहण लागणार आहे.शिर्क्यांच्या फितुरीमुळे संभाजी राजे मोगलांच्या कैदेत सापडल्याची इतिहासात नोंद आहे. हाच भाग आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये दिसणार आहे. 

 

 

संभाजीराजे मावळ्यांना राणीसाहेबांना घेऊन रायगडावर जाण्याची सुचना देत असतात तोच एक मावळा घात झाला असं ओरडत येतो. संभाजी महाराज ऐनवेळी आलेल्या गनिमाविरोधात पराक्रमाची शर्थ करतात. पण दुर्दैवाने ते गनिमांच्या तावडीत सापडतात. हा एपिसोड 13 फेब्रुवारीला गुरुवारी रात्री 9 वाजता प्रसारित केला जाणार आहे. ही मालिका आता शेवटाकडे जाताना दिसत आहे. फितुरीचा प्रोमो रिलीज झाल्यावर नेटिझन्सनीही भावनिक कमेंट केल्या आहेत. ‘आता इथून पुढचा एपिसोड पाहणं केवळ अशक्य आहे.’ ‘सह्याद्रीचा धाकलं धनी गनिमांच्या तावडीत सापडलं.’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्सनी केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share