‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर या व्यक्तीचं आकस्मिक निधन, कलाकारांनी उचललं हे पाऊल

By  
on  

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या सेटवरील एका व्यक्तीचं नुकतंच निधन झालं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा थकवा चहा-कॉफी पाजवून दूर करणारे ओमभाई यांचं निधन झालं. शेवंता फेम अपुर्वा नेमळेकरने त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रात्रीस खेळ चाले २ ही तुमची लाडकी मालिका , त्यातले सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाला सुरुवात व्हायची ती म्हणजे ओम भाई यांच्या हातच्या चहा आणि कॉफी ने . ओम भाई हे आमच्या सेटवर चहा कॉफी साठी स्पेशल होते. तारीख ८.२ .२०२० त्यांनी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ४वाजता चहा कॉफी दिली.आणि अचानक छातीत दुखायला लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं आणि उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते निधन पावले. रात्रीस खेळ चाले १ आणि २ या दोन्ही मालिकेतल्या सर्व टिमला त्यांनी तरोताजा केले.म्हणुन आम्हा सर्वांना त्यांची उणीव कायम भासत राहील.त्याच्या पश्चात पत्नी , ३ मुली आणि १मुलगा असा परिवार आहे.म्हणुन त्यांच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या बायकोवर येऊ नये म्हणून आमच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील टीमने असा विचार केला की कोणाला शक्य होईल तेवढा निधी आपण ओम भाई यांच्या परिवारासाठी जमा करु. आपणांस सांगु इच्छिते की तुम्हाला जर काही निधी द्यायचा असेल तर मी खाली त्यांच्या मुलीच्या अकाउंटची माहिती दिली आहे.आम्हाला माहिती आहे तुम्ही अवश्य मदत कराल. धन्यवाद. . #apurvanemlekar #shevanta #shevantaswag #shevantalovers #ratriskhelchale2 #zeemarathi #humanityhelp #spotdada #ratriskhelchale #wemissyou #chailovers #coffeelovers

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

शनिवारी, ८ फेब्रुवारीला मालिकेच्या सेटवर ओमभाई यांनी सगळ्यांना चहा-कॉफी दिली आणि अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाही. अशा आशयाची पोस्ट अपुर्वा नेमळेकरने शेअर केली आहे. याशिवाय तिने ओमभाईंच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ च्या सेटवरील कलाकारांनीही ओमभाईंच्या घरच्यांना मदतीचा हात दिला आहे.

Recommended

Loading...
Share