‘रात्रीस खेळ चाले’चं होणार हिंदी वाहिनीवर प्रक्षेपण, हे आहे हिंदीतील टायटल

By  
on  

प्रेक्षकांना घाबरण्यास भाग पाडणारी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. झी मराठीवर प्रसारित होत असलेल्या या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता ही मालिका हिंदी प्रेक्षकांनाही घाबरवण्यासाठी तयार झाली आहे.या मालिकेचा पहिला भाग आता अ‍ॅण्ड टीव्ही या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. ‘रात का खेल है सारा’ असं या मालिकेचं हिंदीतील नाव आहे. 29 फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
पहिल्या भागातील नाईकांचा वाडा आणि आये, सुशल्या, दत्ता, सरिता, निलीमा, नेने वकील, अभिराम, माधव, विश्वासराव या कलाकारांनी अभिनयाद्वारे मालिकेतील थरार जिवंत केला होता. आता हाच थरार हिंदीत अनुभवता येणार आहे.

Recommended

Loading...
Share