By  
on  

‘माझा होशील ना’ मधून या अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

वेगवेगळे विषय मालिकेतून समाजासमोर आणणा-या झी मराठीवर ‘माझा होशील ना’ ही येण्यास मालिका सज्ज झाली आहे. या मालिकेत विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे  यांच्यासोबत एक नवीन जोडी दिसत आहे. 
ही जोडी आहे, विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे.

 

 

या मालिकेतून हे विराजस, छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्याच्यासोबत असलेली गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे.पुरुषांच्या घरात शेंडेफळ असलेल्या आदित्य घरातल्यांच्या इच्छा पुर्ण करता करता गर्लफ्रेंड असलेल्या गौतमीला वेळ देतो का हे लवकरच कळेल. 2 मार्चपासून ही मालिका सोम. ते शनिवारी रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive