गुरुनाथला भिडणार या तिघीजणी, पाहा कोण कोण आहेत या?

By  
on  

राधिकासारखी उत्तम बायको असताना शनायाचा हात धरुन गुरुनाथने त्याचा संसार तर मोडला होताच. पण आता प्रगतीसाठी मायाचा वापर करून त्याने शनायालाही फसवायला सुरुवात केली आहे. पण शनायाला ही बाब लक्षात आली आहे. ती गुरुनाथ आणि मायाला रंगेहाथ पकडते. यावर ती गुरुनाथवर बरीच उखडते. याचवेळी ती गुरुनाथसोबत त्याचं नातं संपल्याचंही सांगते. शनायाचा हा अवतार पाहून मायाही गुरुनाथलासोडून जाते. 

 

 

आता गुरुनाथला चांगला धडा शिकवण्यासाठी राधिका, माया आणि शनाया एकत्र आल्या आहेत. आता या तिघी एकत्र येऊन गुरुनाथला चांगलाच धडा शिकवतील. याशिवाय या मालिकेची वेळही बदलली आहे. ही मालिका 2 मार्चपासून रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची जागा ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने घेतली आहे.

Recommended

Loading...
Share