शिवाने सिद्धीला दिलं हे अनोखं सरप्राईज

By  
on  

अनेक अडचणी, गैरसमज वाद-विवादानंतर शिवा आणि सिद्धी यांच्यात पहिल्यांदा मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं. आता हे मैत्री आणि प्रेमाचं नातं आता लग्नबंधनात बांधलं गेलं आहे. आत्याबाईंचा द्वेष बाजुला ठेवून शिवा-सिद्धी कायमसाठी एकमेकांचे झाले आहेत. मालिकेमध्ये दोघांच्या संमतीने, आनंदात आणि मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा साजरा झाला.

 

 

यावेळी मुलीकडून म्हणजे सिध्दीकडून होत्या काकी, सोनी आणि शिवाकडून असणार होते जलवा, पिंट्या-बबल्या. मधुचंद्राच्या रात्री शिवाने सिद्धीसाठी खास सरप्राईज अ‍रेंज केलं आहे. नदीकिनारी शिवाने सिद्धीसाठी खास टेंट लावला आहे. त्याला डेकोरेशनही केली आहे. हे पाहून सिद्धीनेही शिवावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

Recommended

Loading...
Share