By  
on  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत होणार महात्मा आणि महामानवाची भेट

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतून बाबासाहेबांच्या लढ्यातील अनेक ऐतिहासिक प्रसंग जिवंत होत आहेत. या आठवड्यात मालिकेत महात्मा गांधी आणि बाबासाहेबांच्या भेटीचा ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच महात्मा आणि महामानवाच्या भेटीचा क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चवदार तळे आणि काळाराम मंदिराच्या क्रांतीकारी चवळीनंतर गोलमेज परिषदतेमध्ये बाबासाहेबांनी बहुजनांच्या हक्कांसाठी केलेला पाठपुरावा अतिशय महत्त्वाचा होता. शीख व मुस्लीम याप्रमाणे बहुजनांनाही विशेष राजकीय अधिकार मिळावे ही बाबासाहेबांची मागणी होती तर अस्पृश्य हे हिंदू आहेत त्यामुळे अस्पृश्यांना इतर अल्प्संख्यांकांसह स्वतंत्र मतदार संघ देण्याची काही गरज नाही हा गांधीजींचा हेका कायम होता. याच मुद्यावरुन महात्मा आणि महामानव यांच्यात बरेच मतभेद झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत होणार आहे.

हे अनुभवण्यासाठी  पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दररोज रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive