आता गुरुनाथ येणार अडचणीत, कारण राधिकाला साथ मिळणार या महत्वाच्या व्यक्तीची

By  
on  

माझ्या नव-याची बायको मालिकेत सध्या रंजक वळण आलेले दिसत आहे. या मालिकेत गुरुनाथ सुभेदारच्या बदफैली वागण्यामुळे आयुष्याला नवीन सुरुवात केलेल्या राधिकाच्या आयुष्यातही त्याच्यामुळे अनेक अडचणी येताना दिसत आहेत.पण आता राधिकाला आणखी एक सोबत मिळालेली आहे.

 

 

राधिकाला आता सोबत मिळणार आहे ती शनायाची. महत्त्वाकांक्षी गुरुनाथ यश मिळवण्यासाठी मायाला प्रेमाच्या जाळ्यात ओढू पाहतो आहे. मायाशी जवळीक साधताना त्याने शनायाशी संबंध संपवण्याचं ठरवलं आहे. या संदर्भात त्याने शनायाशी वादही घातला आहे. गुरुनाथने फसवणूक केल्याची बोच शनायाला आहे.

 

 

गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी शनायाने आता राधिकाची मदत घेतली आहे. शनायाने राधिकाला गुरुनाथ तिला मायासाठी सोडून जाणार असल्याबाबत सांगितलं आहे. यावर राधिकाने शनायाला मदत करायचं मान्य केलं आहे. आता राधिका आणि शनाया मिळून गुरुनाथला कसा धडा शिकवतात हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share