By  
on  

सोनीचा लग्नाला असलेला नकार, शिवाला पडणार का महागात?

‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेतील शिवा-सिद्धीच्या रोमॅंटिक वळणानंतर आता एक नवा ट्वीस्ट आला आहे. शिवाची बहीण सोनीशी आत्याबाईंच्या मुलाला सरकारला लग्न करायचं आहे. पण सिद्धी, शिवा आणि सोनीलाही हे लग्न मान्य नाही. सोनीचं हित या लग्नात नाही हे शिवाही जाणून आहे. 

 

 

त्यामुळेच शिवा याबाबत आत्याबाईंशी बोलताना दिसतो. शिवा आत्याबाईंना म्हणतो, ‘माझा जीव घ्या. पण माझ्या ठमाबाईची किंमत माझ्या जीवापेक्षा जास्त आहे. तिला हे लग्न करायचं नाही.’ असं म्हणताच आत्याबाई शिवाच्या अंगावर त्याची बंदूक रोखतात. आता सोनीचा नकार शिवाला भोवणार कि आत्याबाई शिवाचं म्हणणं ऐकणार हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive