आता सुरु होणार आनंदीच्या स्वप्नांचा नवा प्रवास, ही अभिनेत्री दिसणार भूमिकेत

By  
on  

‘आनंदी हे जग सारे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. या मालिकेत  स्वमग्नता किंवा ऑटिझम  या विषयावर प्रकाश टाकला आहे. राधा धारणे ही साकारत असलेल्या आनंदीची भूमिका अनेकांना आवडली आहे. या मालिकेत आता आणखी एक नवीन वळण येत आहे. 
आतपर्यंत आपण लहान आनंदीचा प्रवास पाहिला. तिची धडपड, संघर्षही पाहिला. पण या मालिकेत आता हटके वळण येणार आहे.

 

 

ही मालिका आता लीप घेणार आहे. मालिकेत आता आनंदी मोठी झालेली दिसणार आहे. या मोठ्या आनंदीची भूमिका साकारणार आहे रुपल नंद. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री नीना कुळकर्णी अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. नीना आनंदीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. नव्या आनंदी मालिकेत एंट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share