शनाया आणि राधिका उभारणार आत्मसन्मानाची गुढी, पाहा गुढीपाडवा स्पेशल

By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत सध्या रंजक वळण आहे. खरं तर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच मालिकांचं शुटिंग थांबलं असलं तरी माझ्या नव-याची बायको या मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुनाथ विरोधात राधिकाला आता सोबत मिळाली आहे ती शनायाची.

 

 

 गुरुनाथ सुभेदारच्या बदफैली वागण्यामुळे  शनायाला आपण राधिकाबाबत केलेल्या चुकांची जाणीव झाली आहे. शनायाने राधिकाला गुरुनाथ तिला मायासाठी सोडून जाणार असल्याबाबत सांगितलं आहे. यामळेच तिने गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी राधिकाची मदत मागितली आहे. राधिकानेही शनायाला मदत करण्याचं मान्य केलं आहे. गुढीपाडव्याचा मुहुर्त साधात हा भाग रंगणार आहे. यावेळी रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये ‘गुढीपाडव्यादिवशी होणार नवं पर्व सुरु, आम्ही दोघी आलो आहोत आता तु भाग गुरु.....’ असं म्हणत शनाया आणि राधिकाने गुरुनाथ विरोधात कंबर कसली आहे.

Recommended

Loading...
Share