By  
on  

प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘फुलपाखरु’ येणार भेटीला

सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो तो म्हणजे लॉकडाऊन. या एका शब्दाने सध्या प्रत्येकाचं आयुष्य व्यापलं आहे. करोनाने आज जवळपास प्रत्येकालच घरी बसण्यास भाग पाडलं. करोनामुळे आजपर्यंत जवळपास तीन अब्ज लोक घरात बंदिस्त आहेत. अशा वेळी रामायण, महाभारत सारख्या अनेक मालिका पुन्हा सुरु होत आहेत. यात आणखी एका मालिकेची भर पडली आहे. 

 

 

मानस-वैदेही या गोड कपलची लव्हस्टोरी फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हळवा मानस आणि लोभस वैदेही यांच्यावर प्रेक्षकांनी खुप प्रेम केलं. या मालिकेतील मानस आणि वैदेहीच्या मित्रमैत्रिणींची बाँडिंगही लोकप्रिय झाली. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याचवेळी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव झी युवावर फुलपाखरु ही मालिका पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका कधी प्रसारित होईल हे समोर आलं नसलं तरी प्रेक्षक मात्र ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार याच आनंदात आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive