By  
on  

तुमचे लाडके चिमणराव व गुंड्याभाऊ दूरदर्शनवर येतायत पुन्हा भेटीला

देशभरात करोनामुळे परिस्तितीत दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. दररोज करोनाग्रस्तांच्या संख्येत जादूई आकड्याने वाढ होत आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार आज ठप्प आहेत.प्रत्येक जण आज आपापल्या घरातून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे विरंगुळा म्हणून काय..असा प्रश्न निर्माण झाला. पण रामायण व महाभारत या जुन्या व पौराणिक मालिका लोकग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात आल्यानंतर आता मराठीतल्या जुन्या मालिकाही पुन्हा सुरु करण्यास मराठी वाहिन्यांनी सुरुवात केलीय. 

सह्याद्री वाहिनीनं देखील गाजलेल्या अशा मराठी मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सह्याद्रीवर दाखण्यात येणारी ही गाजलेली मालिका आहे 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ'. मराठी प्रेक्षकांच्या आजही आठणीत असलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका. चिमणराव साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने ती सजली. 

या मालिकेने त्यावेळी रसिकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं. विनोदी लेखक चि.वि जोशी यांच्या 'चिमणराव व गुंड्याभाऊ' यांच्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती. गुंड्याभाऊची भूमिका बाळ कर्वे यांनी साकारली. 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' ही मालिका रोज रात्री ७.३० वा. आणि रात्री १०.०० वा पाहता येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive