मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी म्हणते, "Lockdown जरी चालू असलं तरी..."

By  
on  

आज करोना संकटामुळे  सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. तर कोणी घरी नवनवीन कल्पना शक्तीला वाव देत आहेत. तर कोणी घरच्या घरीच मस्त फोटोशूट करतंय, सेल्फी काढतंय, घराच्या खिडकीतून निसर्ग टिपतंय. 

मिसेस मुख्यमंत्री फेम तुमचीी लाडकी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे हिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन नेटकरी आणि चाहत्यांना लॉकडाऊन दरम्यान एक भन्नाट सल्ला दिला आहे. अमृता म्हणते, "Lockdown जरी चालू असलं तरी photo हा रोज निघालाच पाहिजे ना". इतकंच नाही त ती तिच्या मालिकेच्या शूटींगच्या दिवसांना खुप मिस करतेय. सध्या अमृता पुण्यात आपल्या घरी आहे.  

अमृताच्या या गोड फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा चाहत्यांनी वर्षाव केला आहे. अमृता ही नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. शूटींग दरम्यानचे विविध भन्नाट व्हिडीओ आणि मि. मुख्यमंत्री म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेसोबतचे धम्माल-मस्तीचे व्हिडीओ शेअर करते. 

 

Recommended

Loading...
Share