संकटांना दूर करण्यासाठी येत आहेत दु:खहर्ता श्री गणेश

By  
on  

गणपती बाप्पा म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकाचच लाडकं दैवत. याच लाडक्या दैवताची गोष्ट स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे ‘श्री गणेश’ या पौराणिक मालिकेतून. खास बात म्हणजे मंगळवार २६ मेला संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर ही पौराणिक मालिका सुरु होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता बाप्पाचा महिमा प्रेक्षकांना अनुभवता येईल.

बाप्पाच्या जन्माची कथा आपण ऐकली आहेच. हीच गोष्ट स्टार प्रवाहवरच्या श्री गणेश मालिकेतून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. बाप्पाच्या आगमनाची ओढ प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. त्यामुळे बाप्पाचा अगाध महिमा मालिकेतून अनुभवायला मिळणं ही प्रत्येकासाठीच अनोखी पर्वणी असेल. निर्माते धीरज कुमार यांनी काही वर्षांपूर्वी या पौराणिक मालिकेची निर्मिती केली होती. तेव्हा पाहायला विसरु नका दु:खहर्त्या गणरायाची कथा श्रीगणेश २६ मे पासून दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

Recommended

Loading...
Share