गुड न्यूज : लाडके श्री आणि जान्हवी पुन्हा येत आहेत तुम्हाला भेटायला

By  
on  

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गाजलेल्या मालिका पुन्हा रसिकांच्या दिमतीस हजर झाल्या आहेत. विरंगुळ्यासाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी पुन्हा  एकदा जुन्या  मालिका प्रक्षेपित करण्याचा निर्णय अनेक वाहिन्यांनी घेतला आहे. सर्वचजण आज सक्तीने घरी असल्याने प्रत्येकाला या आवडत्या मालिकांचा आनंद घेता येणार आहे. 

मराठी प्रेक्षकांसाठी आता एक आनंदाची बातमी. सर्वांची लाडकी श्री आणि जान्हवीची जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे. सहा सासूबाई व संपूर्ण घराला आपल्या प्रेमाने जोडणारी एक सूनबाई अशी सर्वांची लाडकी मालिका 'होणार सून मी या घरची' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ही मालिका तेव्हा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली होती. यातील प्रत्येक कलाकाराला या मालिकेने नवी ओळख दिली. 

Recommended

Loading...
Share