By  
on  

‘राजा राणीची गंं जोडी’ या मालिकेला मिस करताय? पाहा हा धमाल व्हिडियो

सध्या सगळीकडे लॉकडाऊनचं राज्य आहे. त्यामुळे सुरु असलेले, गजबज असलेले सर्व व्यवहार ठप्प आहेत. सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचं शुटिंगही बंद आहे. राजा राणीची ग जोडी ही मालिका त्याला अपवाद नाही. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली. सर्वांनाच रणजीत व संजीवनीची केमिस्ट्री पाहण्याची आतुरता लागून राहिली आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maniraj Pawar (@manirajpawarofficial) on

 

अशा वेळी मणिराजने या मालिकेसाठी हटके फंडा आजमावला आहे. मणिराजने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये वॉट्स अ‍ॅप ग्रुप दिसतो. ढाले पाटील कुटुंबाचा हा ग्रुप आहे. बेबी मावशींनी हा ग्रुप क्रिएट केलेला दिसत आहे. पण या ग्रुपवर चालणारं चॅट पाहून तुम्हाला जणू मालिका पाहात असल्याचच फील येईल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive