By  
on  

पाठकबाईंनी पुन्हा शेअर केला 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवरचा धम्माल Video

आता करोना संकटामुळे जवळपास दोन महिने उलटून गेले तरी लॉकडाऊन संपण्याची चिन्ह नाहीत. परिस्थिती अजूनही बिकटच म्हणावी लागेल. पण सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण आता घरी बसून कंटाळले आहेत. कितीही छंदात, घरकामात मन गुंतवलं तरी आता सर्वांना आपल्या रोजच्या रुटीनची आठवण सतावू लागली आहे. सेलिब्रिटांना त कधी एकदा सेटवर जातोय आणि आपल्या सहकलाकारांसह संपू्र्ण टीमला भेटतोय असं झालं आहे. 

पाठकबाईंना तर तुझ्यात जीव रंगला सेटची खुप आठवण येतेय....त्यामुळे मग त्या फोन गॅलरीतून शोधून शोधून व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करत आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री अक्षया देवधरसुध्दा घरीच क्वारंटाईन वेळ घालवतेय. पण तिलासुध्दा आता रुटीनची आठवण येतेय.अक्षयाला ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवरची धम्माल-मस्तीची, संपूर्ण टीमची खुप आठवण येतेय. म्हणूनच तिने सेटवरचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत राणा दा, सूरज आणि बरखत इतरांसह मोठमोठ्याने...संदेशा आया है ...हे गाणं मोठ्यामोठ्याने म्हणतायत, यापूर्वीसुध्दा एक भजनाचा सेटवरचा जबरदस्त व्हिडीओ अक्षयाने शेअ केला होता. 

करोनाचं हे संकट लवकरच टळू दे व आपण सर्व पुन्हा आपापल्या रुटीनमध्ये परतू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अक्षया तु सुध्दा थोडा संयम ठेव लवकरच तुलाही तुझ्या संपूर्ण ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमला भेटायला मिळेल ही सदिच्छा !
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive