By  
on  

प्रेक्षकांसाठी आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर येणार आवडत्या मालिकांचे शॉर्ट वेबीसोड्स, प्रेक्षकांसाठी मालिकांचे नवे कोरे भाग

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. आता लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तरी गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक हे टेलिव्हिजनवर मालिकांचे, शोचे जुने भाग  आणि जुन्या मालिका पाहत आहेत. आणि याच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनीच्या फेसबूकवर काही खास पाहायला मिळणार आहे.
येत्या शनिवारपासून झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे आवडते कलाकार भेटीला येणार आहेत. डिजीटल प्लॅटफॉर्मवर ही मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळेल. या वाहिनीच्या प्रसिध्द मालिकांचे नवे कोरे भाग अर्थात शॉर्ट वेबिसोड्स पाहायला मिळणार आहेत. या भागांसाठी मालिका कलकारांनी घरातूनच चित्रीकरण केलेलं आहे.  या नव्या कोऱ्या भागांमध्ये प्रसिध्द मालिकांचे कलाकार पाहायला मिळतील.

 

‘अग्गंबाई सासूबाई’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या आणि इतर प्रसिध्द मालिकांचे कलाकार डिजीटल प्लॅटफॉर्मवर येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. 
तेव्हा इतके दिवस या कलाकारांने मिस करणारे प्रेक्षक, त्यांना पाहण्यासाठी आसुसलेल्या प्रेक्षकांचं हे वेबिसोड्स समाधान आणि मनोरंजन करतील एवढं नक्की.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive