By  
on  

बदलेले वारे घेऊन आले आहेत नवा कार्यक्रम 'घरात बसले सारे'

आज लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरी आहेत. सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे.पण शूटींग बंद असलं तरी मनोरंजनाची कुठलीच कसर कमी पडू न देण्याचा कलाकारांनी चंगच बांधलाय. अलिकडेच आठशे खिडक्या नऊशे दारं या मालिकेसाठी  घरात राहून कलाकारांनी शूटींग मोबाईल कॅमे-यावर केल्यानंतर आता झी मराठी वाहिनीवर एक नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

भरपूर मनोरंजनाने भरलेली ही मेजवानी येणार आता तुमच्यासमोर.आता बदललेत वारे घेऊन येतोय नवा कोरा कार्यक्रम 'घरात बसले सारे' . लवकरच झी मराठी वाहिनीवर. अशी पोस्ट झी मराठीने केली आहे. बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे प्रसिध्द रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजित पाध्ये हा बोलक्या बाहुल्यांचा शो घेऊन येतोय ते थेट त्यांच्या घरातूनच. 

रसिकांना हा नवा कोरा रिफ्रैशिंग कार्यक्रमाची छान मेजवानीच मिळणार असल्याने सर्वचजण या आगळ्य-वेगळ्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive