By  
on  

मालिकांच्या शुटिंगला पुन्हा लागला ब्रेक , जाणून घ्या

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा ग्रहण लागण्याची चिन्ह दिसून येत आहेत. ठाण्यामध्ये जवळपास आठ मालिकांचं चित्रिकरण पुन्हा सुरु झालं होतं. पण गुरुवारपासून सुरु असलेलल्या लॉकडाऊनमुळे या मालिकांच्या चित्रिकरणावर पुन्हा सावट आलं आहे. या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा शुटिंग थांबवण्याचं संकट निर्मात्यांवर आहे.   

खरं तर इनडोअर शुटिंगचा पर्याय अनेक दिग्दर्शकांनी निवडला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी दिग्दर्शकांकडून केली जात आहे. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात येत आहे. सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन मधून सुट मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive