By  
on  

कार्तिक-दीपाच्या लग्नाची धूम, 'रंग माझा वेगळा' मालिका आता नव्या वेळेत

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. आता लॉकडाऊननंत ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षंकाच्या मनेरंजनासाठी सज्ज झालीय पण नव्या वेळेत.  उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे रंग माझा वेगळाचे एपिसोड्स १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या लोकप्रिय मालिकेत सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, आम्ही सर्वच कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. रात्री ८ वाजता मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येणार आहोत.. कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत उत्कंठावर्धक वळणार येऊन मालिका थांबली होती. आता रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिक-दीपाच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल तर सौंदर्या इनामदार कोणती खेळी खेळतात हे, पाहणंसुध्दा औत्सुक्याचं ठरेल.

 

तेव्हा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता रंग माझा वेगळा पाहायला विसरु नका.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive