लॉकडाऊननंतर आता मनोरंजनविश्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या सेवेसाठी सज्ज झालं आहे. मालिकेतली नवी वळणं व नवे एपिसोड्स घेऊन तुमच्या आवडत्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे, अण्णा नाईकांनी प्रेक्षकांना साद दिली आहे. नाईकांचा वाडा उघडतोय..येत्या १३ जुलैपासून.म्हणजेच सर्वांची लाडकी मालिका आणि शेवंता-अण्णांची अफलातून केमिस्ट्री दाखवणारी रात्रीस खेळ चाले -२ मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
पुनश्च हरिओम म्हणत आता हळूहळू मालिका-सिनेमांच्या शूटींगचा श्रीगणेशा होतोय. योग्य ती खबरदारी घेत आणि सरकारी नियम व अटींचं काटेकोर पालन करत तुमच्या मनोरंजनासाठी लाडक्या मालिका सज्ज होत आहेत. त्यामुळे आता रिपीट्स बघून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
छोट्या पडद्यावरची कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले २. महाराष्ट्रातच नाही तर जगभरच्या मराठी प्रेक्षकांची ही लाहती मालिका आहे.
रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील अण्णा-शेवंताची केमिस्ट्री तुफान गाजतेय, त्यामुळे मालिकेचे लॉकडाऊननंतरचे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर झाले आहेत.