By  
on  

सुकन्या मोने यांनी दिलीप प्रभावळकरांना या खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस. उत्तम प्रतिभेचा कलावंत आणि अत्यंत विनयी माणून दिलीप यांची ओळख आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेत सहज मिसळून जाणारा कलाकार म्हणून प्रभावळकरांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सुकन्या मोने यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. ‘चुकभुल द्यावी घ्यावी’ या मालिकेचा हा प्रोमो आहे. यात सुकन्या मोने आणि दिलीप प्रभावळकरांनी एकत्र काम केलं आहे. 

 

 

या मालिकेचा प्रोमो त्यांनी शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुकन्या म्हणतात, ‘ज्यांच्याबरोबर काम करताना खूप मज्जा आली,खूप काही नकळत शिकता आलं अश्या दिलीप भैय्यांना म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके चिमणराव म्हणजेच दिलीप प्रभावळकरांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा’ या मालिकेतील भन्नाट जोडीने सगळ्यांना खळखळून हसवलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive