‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेने पुर्ण केला 100 भागांचा टप्पा

By  
on  

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली आहे. सर्वांनाच रणजीत व संजीवनीची केमिस्ट्री खुप आवडली. नुकत्याच सुरु झालेल्या नव्या एपिसोड्सची प्रेक्षकांमध्ये खुप उत्सुकता आहे. अवखळ, निर्मळ असलेली संजीवनी ढाले-पाटलांच्या घरी सून म्हणून आली आहे. पण सासूबाईंच्या कठोर शिस्तीत तिचा निभाव कसा लागतो हे पाहणं रंजक ठरतं.

 

 

बेबी आत्याच्या मायाळू स्वभाव आणि रणजितचा प्रेमळ स्वभावात संजीवनी चांगलीच रमली आहे. या मालिकेने आपले 100 भाग पुर्ण केले आहेत. तुमच्या प्रेमामुळे हे भाग पुर्ण झाले अशी पोस्ट करत वाहिनीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Recommended

Loading...
Share