‘वजनदार’ दोघांची दमदार लव्हस्टोरी दिसणार’ ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत

By  
on  

प्रेमामध्ये वय, जात, स्तर, वजन काहीही नसतं. पण हे निकष मात्र लग्नाच्या बाजारात लागू होत नाहीत. पण एक जाड असलेली मुलगी, जिला जाड असल्यामुळे लग्नासाठी नकार येतात तिला मात्र समजून घेणारा जोडीदार हवा आहे. हा हटके विषय असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

 

अभिनेत्री अक्षया नाईक या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. या प्रोमोमध्ये अक्षयासोबत आणखी एक मुलगा दाखवला आहे. अभिनेता समीर परांजपे या मालिकेत अक्षयासोबत दिसेल. कसरत करणा-या या मुलाला बायको मात्र फिट पाहिजे आहे.  आता या दोघांची गाठभेट कशी होईल. झालीच तर या दोघांचे सुर जुळतील का हे मात्र आता मालिका पाहिल्यावरच कळेल. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share