‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सुरु होणार ‘लेडिज जिंदाबाद’ पर्व

By  
on  

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग अफाट आहे. या शोमधील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. यापुर्वी या शोचा सेलिब्रिटी पॅटर्न प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता एक नवं कोरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सिद्ध झालं आहे. यावेळचं पर्व सगळ्यात खास असणार आहे. कारण या पर्वात आहे अभिनेत्रींची फौज.

 

 

चला हवा येऊ द्या च्या या लेडिज जिंदाबाद पर्वात सरिता मेहंदळे-जोशी, पुर्वा शिंदे, स्नेहलता वसईकर, शिवानी बावकर, सुरुची आडारकर, भक्ती रत्नपारखी, मोनालिसा बागल, गायत्री दातार, मयुरी वाघ, संजीवनी साठे या अभिनेत्री दिसणार आहेत. आता या अभिनेत्रींना स्टेजवर पाहणं चाहत्यांसाठी आनंददायी असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share