सोहमची नवी खेळी भोवणार का अभिजीत आणि आसावरीला?

By  
on  

‘अग्गबाईसासूबाई’ मालिकेत मुलगा आणि संसार यात आसावरीची चांगलीच तारेवरची कसरत होताना दिसते आहे. नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनही सोहमच्या हाताला यश मिळत नाही. अशावेळी तो सहानुभूती मिळवण्यासाठी शिपायाची नोकरी करणार असल्याचं शुभ्रा आणि आसावरीला सांगतो. हे ऐकून आसावरी आणि शुभ्रा नाराज होतात.

 

 

एके ठिकाणी कामासाठी गेला असता त्याला तिथेही अपयश मिळतं. यानंतर त्याला अभिजीत राजे अभिज किचनमध्ये जॉईन करण्याची संधी देतात. पण या दरम्यान सोहमच्या मनात मात्र वेगळीच खेळी सुरु असल्याचं दिसत आहे. सोहमची अभिज किचनमधील एंट्री कोणत्या नव्या वादाला तोंड फोडणार हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share