पिंकीने दिला गुरुनाथला जबरदस्त झटका, काय होईल त्याची अवस्था?

By  
on  

माझ्या नव-याची बायको मालिकेत आता एक नवीनच वळण येताना दिसतं आहे. या मालिकेत आता एंट्री झाली आहे ती पिंकीची. शनायाने प्रॉमिस केल्याप्रमाणे पिंकी गुरुनाथच्या भेटीला आली आहे. स्टायलिश लूक घेऊन आलेली पिंकी गुरुनाथला भेटते. पण गुरुनाथ तिच्याशी उद्दामपणे वागतो. यावर पिंकी थेट गुरुनाथच्या श्रीमुखात लगावते. पिंकीचा हा तोरा पाहून गुरुनाथ चांगलाच चाट पडताना दिसतो आहे. तर गुरुनाथची ही फजिती पाहून शनाया आणि राधिका मात्र चांगल्याच खुश झाल्या आहेत.

 

 

 

Recommended

Loading...
Share