सायली-सुयशची केमिस्ट्री कशी जुळतेय ते पाहूयात

By  
on  

एका ऑनलाईन लग्नाची धम्माल गोष्ट लवकरच आपल्यासमोर येतेय. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रथमच सायली संजीव आणि सुयश टिळक ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

आजच्या युगातल्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपची ही गोष्ट असणार आहे, हे या मालिकेच्या प्रोमोजवरुन लक्षात येतंय. पुन्हा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यात लग्नाला होकार देण्यावरुन शंतनू आणि त्याच्या आईने सुचवलेली मुलगी ऑनलाईन आल्यावरचा हा मजेदार सीन ह्या प्रोमोत पाहायला मिळतोय. 
"शुभमंगल ऑनलाइन" ही नवी कोरी मालिका येत्या 28 सप्टेंबरपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. 

 

कलर्स मराठीवर अभिनेता सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेअंतर्गत  "शुभमंगल ऑनलाइन" ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. सुयश टिळक आणि सायली संजीव ह्या मालिकेचे नायक-नायिका आहेत. तसंच अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचीसुध्दा ह्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतायत. त्या सुयशच्या आईच्या भूमिकेत दिसतील. 
 "शुभमंगल ऑनलाइन" या आगामी मालिकेचे प्रोमोज् पाहून ही प्रत्येकाच्याच घरातील  एक हलकी-फुलकी कहाणी असल्याचं लक्षात येतंय. त्यामुळेच सर्वांनाचा ही मालिका कधी भेटीला येतेय, याची उत्सुकता लागली आहे.

Recommended

Loading...
Share