डॉलीबाईंच्या वाढदिवसाचं देवाभाई करतोय जोरदार प्लॅनिंग पण.....

By  
on  

‘डॉक्टर डॉन’ मालिकेतील रोमॅंटिक पर्वाला आता सुरुवात झाली आहे. नुकतंच देवा भाईने डॉलीबाईंसमोर त्याचं प्रेम व्यक्त केलं. डॉलीबाईंनीही या प्रेमाचा स्विकार करत देवासोबतचं नातं मान्य केलं आहे.  अशातच देवाभाईला समजतं की डॉलीबाईंचा वाढदिवस आहे. देवा या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्याचं ठरवतो. देवा डॉलीबाईंना सरप्राईज देण्यासाठी बुकेही पाठवतो. 

 

 

याशिवाय एका सजवलेल्या गाडीत देवा डॉलीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनरला न्यायचं ठरवतो. पण आज डॉलीबाईंचा नाही तर त्यांच्या आईचा वाढदिवस असतो. आता देवाने केलेला जंगी पार्टीचा बेत यशस्वी होणार की फसणार हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share