शाहरुख खानच्या ‘क्लास ऑफ 83’ मध्ये झळकलेला अभिनेता आहे ह्या मराठी मालिकेचा नायक

By  
on  

शाहरुख खानची निर्मिती असेलल्या ‘क्लास ऑफ 83’ ह्या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली होती. बॉबी देओल स्टारर या सिनेमाची बरीच चर्चासुध्दा रंगली.  त्यापैकी असलम खान ही लक्षवेधी भूमिका आपला मराठमोळा अभिनेता समीर परांजपे याने साकारली. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता. 

 

जर तुम्ही छोट्या पडद्यावर नव्यानेच रसिकांच्या भेटीला आलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका पाहत असाल तर या मालिकेतला फिटनेस फ्रिक अभिमन्यू साकारणा-या नायक चांगलाच माहित असेल... समीर परांजपेच या नव्या  मराठी मालिकेचा नायक आहे.  नुकतेच त्याचे काही रुबाबदार फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळाले.

 

 

 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशीलरित्या हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे...स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो, त्यावर ही मालिका प्रकाशझोत टाकते. 

 दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा फिटनेस फ्रिक अभिमन्यू समीर या मालिकेत साकातोय. स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला 'फिट' करायचं आहे म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. पण मालिकेतली नायिका लतिका ही अंगाने जाड-जूड आहे. स्थूलपणामुळे तिला आत्तापर्यंत अनेक स्थळांनी नकार दिलाय. आता तिचं आणि अभिमन्यूचं कसं जुळणार हे मालिके पाहणं औत्सुक्याचं ठरतंय. 

अभिनेत्री मनवा नाईकची निर्मिती असलेली दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट...’सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री ९.00 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येते. 

 

Recommended

Loading...
Share