माधवी निमकर म्हणते, 'मी तिच्याशी वाईट वागत असले तरी..... '

By  
on  

अलीकडेच सुरु झालेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गौरी आणि जयदीपच्या नात्याची केमिस्ट्री, घरात चालणार शह-काटशहाचं राजकारण यातून मालिका खुलत आहे. 
अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. मालिकेत दरारा असलेली माधवी गौरीला या ना त्या कारणने छळत असते.

 

 

पण यावेळी मात्र तिने खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये माधवी गौरीला त्रास देते आहे. पण शॉट संपताच माधवी तिला प्रेमाने जवळ घेते. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये माधवी म्हणते, ‘ हा सीन झाल्यानंतर मला तिच्यासाठी वाईट वाटत रहातं. सिरियलमध्ये मी तिच्याशी वाईट पद्धतीने वागते. पण खरंच ख-या आयुष्यात ती मला खुप आवडते.’

Recommended

Loading...
Share