November 25, 2019
शिवाला मिळणार सिध्दीची साथ !

जीव झाला येडापिसा मालिकेचे चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. सुरमारीच्या या दृश्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मेहेनत घेतली..... Read More

November 23, 2019
रंगणार महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा महाअंतिम सोहळा

सध्याच्या काळात आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की त्यातून थोडा विरंगुळा म्हणून हास्याचा डोस हा अनिवार्य आहे. सोनी मराठी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या नव्या हंगामाच्या निमित्ताने सोमवार ते गुरूवार हाच हास्याचा डोस घेऊन येते. हास्यविश्वाची सैर घडवून हास्याचा डोस पाजणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा हंगाम आता त्याच्या अंतिम टप्प्यात आहे. हा महाअंतिम सोहळा 25 नोव्हेंबरला पार पडणार असून आपल्याला हास्यजत्रेच्या या नव्या हंगामातील विजयी जोडी कोण असेल हे पाहायला मजा येणार आहे. 

सोमवार ते गुरुवार प्रक्षेपित होणाऱ्या या कॉमेडी रिऍलिटी शोच्या अंतिम फेरीत या हंगामाचे जजेस् ही विनोद करताना आपल्याला दिसणार आहेत. हास्यजत्रेचा भाग होऊन ‘मी रडणं विसरले की काय?’अशी शंका आलेली ड्रामा क्वीन अलका कुबल तर 

मकरंद अनासपुरेंचा गावठी ठेचा प्रेक्षक स्कीटमधून अनुभवू शकणार आहेत. सोमवार आणि मंगळवारी पाहायला मिळणाऱ्या हास्यजत्रेच्या नव्या हंगामाची सांगता होणार असली तरी हास्याचे स्फोट प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर सोबत  बुधवार आणि गुरूवारी कायम असणार आहेत. सोमवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीचं वैशिष्ट्य म्हणजे लफडा सदन, गोलमाल, षड्यंत्रसारख्या नाटकांचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या व नाट्यसृष्टीत रमणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. त्यासाठीच अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले या अंतिम फेरीत सहभागी झाले आहेत.

तेव्हा विनोदवीरांच्या कलाकृतींनी नटलेल्या या गंमतीशीर संध्याकाळची मजा नक्की घ्या २५ आणि २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त, सोनी मराठीवर

..... Read More

November 22, 2019
अग्गबाई! अभिजीत आणि आसावरी प्रेमाच्या सायकलवर

झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यामधील निवेदिता जोशी-सराफ यांनी साकारलेली आसावरी आणि गिरीश ओक यांनी रंगवलेली अभिजीत या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाल्या आहेत...... Read More

November 21, 2019
...तर अमिताभ बच्चन दिसले असते मराठी रंगभुमीवर

कलर्स मराठीवर दोन स्पेशल कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे... सगळ्यांनाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या..... Read More

November 11, 2019
Video : सोनी टीव्हीच्या माफीनाम्यानंतर केबीसीच्या सेटवर पोलिस सुरक्षा तैनात

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वादात सापडलेला कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आणि सोनी वाहिनी यांनी शनिवारी आपला माफीनामा सोशल मिडीयावर जाहीर केला. महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा या चुकीबद्दल दिलगिरी..... Read More

November 07, 2019
का अडकलेत श्री दत्त अनघा देवींच्या मोहपाशात?

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. कर्णकुमार आणि जांभासूर यांचा श्री दत्तांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न अखंड सुरु असताना आता या कथानकात अनघा देवींची एण्ट्री होणार..... Read More

October 31, 2019
अनुभवा जिजा-शहाजींच्या लग्नाचा शाही थाट

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा..... Read More

October 30, 2019
‘अग्निहोत्र २’ची उत्सुकता वाढली, प्रेक्षकांना लागलीय मालिकेची ओढ

स्टार प्रवाहवर २५ नोव्हेंबरपासून भेटीला येणाऱ्या ‘अग्निहोत्र २’ मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करु आहे. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकं कोणतं..... Read More

October 30, 2019
शेवंता सारखीच सुंदर आहे अण्णा नाईकांची खरी पत्नी, पाहा Photos

कोकणच्या अण्णा नाईकाचो दरारा तुमका आमका सर्वांकाच माहित असा. अण्णा नाईक आणि शेवंताबद्दल तुम्हाला आता काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. त्यांच्या लफड्याची चर्चा सर्वत्रच सुरु असते. मग ते ऑन स्क्रीन..... Read More

October 29, 2019
गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या साहेबांच्या आयुष्यात येणार का प्रेमाची झुळूक? एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या टेलिव्हिजनवर सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमयी आहे अनेक मालिकांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे. कलर्स मराठीवर लवकरच 'राजा राणीची गं जोडी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या..... Read More