जिजाऊंच्या भूमिकेनंतर आता अमृता पवार दिसणार 'जिगरबाज' भूमिकेत

By  
on  

 'जिगरबाज' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 या मालिकेत अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकार असणार आहेत. त्याप्रमाणेच काही तरुण कलाकारही आहेत. 

 

या मालिकेत प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा एक चेहरा म्हणजे अमृता पवार. या आधी अमृता सोनी मराठी वाहिनीच्या 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊ माँ साहेबांची भूमिका साकारत होती. आता अमृता एका नव्या रूपात नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या मालिकेत अमृता ही डॉ. अदिती हे पात्र साकारणार आहेत. एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली अदिती त्यांच्या घरातली पहिली डॉक्टर मुलगी आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असं काम तिला करायचं आहे. पण छोट्या गावातून आल्यामुळे थोडी भित्री आणि निर्णय घेण्यास कचरणारी अशी अदिती स्वभावानं मात्र मनमिळाऊ आणि समंजस आहे. 

 

 

जिगरबाज ही एका हॉस्पिटलची गोष्ट आहे, सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. अमृताबरोबरच पल्लवी पाटील, श्रेयस राजे आणि विजय पाटील हेही या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.  

नक्की पाहा 'जिगरबाज' ११ नोव्हेंबरपासून सोम.-शनि., रात्री १० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

Recommended

Loading...
Share