वाद-विवादानंतर ‘आई माझी काळूबाई’ मधून प्राजक्ताची एक्झिट, आता ही अभिनेत्री साकारतेय भूमिका

By  
on  

लॉकडाऊन नंतर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यापैकी आई माझी काळूबाई ही मालिका चांगलीच चर्चेत राहिली. दोन महिन्यांपूर्वीच आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर करोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर पुन्हा आता ही मालिका वेगळ्याच कारणाने प्रकाशझोतात आली आहे.  मालिकेतल्या वादाच्या ठिणग्या सर्वांसमोर आल्या आहेत. 

मालिकेत आर्याची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ही मालिका सोडल्याचं समजतंय. निर्मितीसंस्था आणि प्राजक्तामध्ये झालेला वाद हे यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री अलका कुबल ह्या आई माझी काळूबाई मालिकेच्या निर्मात्या आहेत. तसंच त्या मालिकेत त्या काळूबाईंची भूमिकाही साकारताय. 

निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार सेटवर उशीरा येणं , सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सुट्ट्या घेणं, परीक्षा आहे हे सांगून सतत सुटट्या मागणं या प्राजक्ताच्या वागण्यामुळे ती या मालिकेतून बाहेर पडली आहे. आता प्राजक्ताच्या जागी 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री वीणा जगताप आर्याच्या भूमिकेत दिसेल. 

 

 

 

 

 

याबाबत बोलताना निर्मात्या अलका कुबल म्हणाल्या," स्क्रिप्ट 15 दिवस आधीच हवं, मी अमूक एक दिवसच शूटींग करेन , मला परिक्षेसाठी सुट्टी हवी  अशा प्रकारच्या प्राजक्ताच्या अटी होत्या . ज्या पूर्ण करणं शक्यच नव्हतं. अनेकदा तिच्या उशीरा येण्याने शूटींगचं सर्व शेड्यूलच बिघडून जायचं. तिच्यासाठी सिनीयर कलाकार सेटवर ताटकळत बसायचे. याशिवाय प्राजक्ताच्या आईचासुध्दा बराच हस्तक्षेप या सर्वांत असायचा. लॉकडाऊननंतर अनलॉक काळात ती सतत परिक्षांची कारणं द्यायची. या काळात इतक्या कोणत्या परिक्षा असायच्या ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या सर्वाचा खुप मनस्ताप झाला. "

या वादावर प्राजक्ता म्हणाली, "मालिकेचं शूटींग साता-यात असल्याने उशीर होणं, हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. तसंच परिक्षांसाठी मला सुट्टी हवी असेल ही मी आधीच कळवलं होतं. तरीसुध्दा मला परिक्षेसाठी सुट्टी नाकारण्यात आली. मी परिक्षा देऊ शकली नाही." 

 

(source: Maharashtra Times ) 
 

Recommended

Loading...
Share