कोण होणार महाराष्ट्राचा पहिला 'सिंगिंग स्टार' , रंगणार 'महाअंतिम सोहळा!

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवरल्या 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचा हा आठवडा अंतिम टप्पा असणार आहे. या सुरेल कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

या आठवड्यात  पाच स्पर्धकांमध्ये रंगणार आहे  महाअंतिम सोहळा. १२ स्पर्धकांना घेऊन सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम फेरीपर्यंत पोचली आहे. आस्ताद, यशोमान, अर्चना, स्वानंदी आणि गिरिजा या पाच स्पर्धकांमध्ये अंतिम मुकाबला रंगणार आहे. 
 

गेले अनेक आठवडे विविध गाण्यांतून आपलं कौशल्य दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या ताऱ्यांपैकी  सोनी मराठीचा पहिला 'सिंगिंग स्टार' हा किताब कोण जिंकेल, हे पाहणं खरंच उत्सुकतेचं असणार आहे.

पाहा, 'सिंगिंग स्टार' महाअंतिम सोहळा, २०-२१ नोव्हेंबर, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

Loading...
Share