‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेच्या वादावर अखेर पडला पडदा

By  
on  

स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी, भाविकांनी आक्षेप नोंदवला होता. मालिका ही पौराणिक व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी अशी गावकऱ्यांची मागणी सुरुवातीपासूनच सुरू होती. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मालिकेच्या या वादावर अखेर पडदा पडलाय. 

 गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्याकडे धाव घेत याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी (१८ नोव्हेंबर) राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या चर्चेअंती मालिकेचे नि्माते  महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजून घेत, त्यांना आश्वासन दिले की, “जोतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे काही वाहिनीवर दाखवले जाईल त्याच्यात कोणतेही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल.”

 

या मालिकेचा भव्य सेट कोल्हापुरातच उभारण्यात आला आहे. 

Recommended

Loading...
Share