By  
on  

या ऐतिहासिक भूमिकेसाठी अभिनेता राजेश श्रृंगारपुरे शिकतोय घोडेस्वारी

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' ही नवी हिंदी मालिका लवकरच  रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘अहिल्याबाई होळकर’ यांच्या अद्वीतीय जीवनावर आधारित ही मालिका 18व्या शतकातील इतिहास सांगते. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या पाठिंब्याने समाजात प्रचलित पितृसत्ताक रुढींचा हिरीरीने विरोध केला आणि लोकांच्या व विशेषतः महिलांच्या कल्याणासाठी समारात्मक योगदान दिले. अहिल्याबाईंच्या सार्थक जीवनाची ही शौर्यगाथा  आहे, जी तिच्या सासर्‍यांच्या म्हणजे मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य होऊ शकली नसती.

 

 

\अभिनेते राजेश श्रुंगारपुरे हे या मालिकेत ‘मल्हार राव’ यांचे प्रमुख पात्र साकारत आहे. त्यांनी या मालिकेसाठी घेत असलेल्या प्रशिक्षणाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “ मल्हार राव होळकर यांचे पात्र साकारताना, अनेक गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात. विशेषत: पोशाख, बॉडी लँग्वेज आणि शब्दोच्चार. शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा घोडेस्वारी आणि तलवारबाजी या दोन गोष्टी कठीण पण प्रतिष्ठित अशा वाटल्या. घोडेस्वारीमुळे मला माझे स्नायू अधिक बळकट करण्यास मदत झाली. तर तलवारबाजीमुळे माझी शरीरयष्टी आणि संतुलन साधता आले. एक अभिनेता  म्हणून या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देणं माझं कर्तव्य मानतो.   मल्हार राव होळकर साकारताना मी जे करतोय, त्यासाठी माझ्यातील सर्वोत्कृष्ट देईन, असे मला वाटते. अर्थात मला मार्गदर्शन करणारे व माझ्या पाठिशी उभ्या राहणारे सर्व प्रशिक्षक आणि अॅक्शन डायरेक्टर्स यांना मी आवर्जून धन्यवाद देतो.” 


नव्या वर्षात एक सुंदर कलाकृती- ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’   पहाण्यासाठी तयार रहा. ४ जानेवारी पासून दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता. फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive