दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, 'बिग बॉस मराठी - 3' येतय लवकरच

By  
on  

बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हिंदीत अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर मराठीतही बिग बॉस हा कार्यक्रम सुरु झाला. 2018 पासून बिग बॉसच्या मराठी वर्जनला सुरुवात झाली. पहिलाच सिझन हा लोकप्रिय ठरला. त्यानंतर दुसरा सिझनही प्रेक्षकांना आवडला. प्रेक्षकांना आगामी तिसऱ्या सिझनची उत्सुकता मागील वर्षापासून लागली होती. मात्र कोरोना काळात याविषयी कोणतीच घोषणा झाली नाही. मात्र आता लवकरच बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

कलर्स मराठी वाहिनी आणि या कार्यक्रमाचे सुपर होस्ट महेश मांजरेकर यांनी सोशल मिडीयावर ही घोषणा केली आहे.  "दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय  बिग बॉस मराठी-3 लवकरच कलर्स मराठीवर." असं म्हणत नवा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. तर महेश मांजरेकर लिहीतात की, "त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… बिग बॉस मराठी-3 लवकरच कलर्स मराठीवर."

तेव्हा या कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये या तिसऱ्या सिझनची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली होती अभिनेत्री मेघा धाडे तर शिव ठाकरे हा दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. आता तिसऱ्या सिझनमध्ये कोण स्पर्धक असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share