By  
on  

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी संसार सुरु असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही भन्नाट आहेत, याची प्रचिती वेळेवेळी सोशल मिडीयावर येते.

रितेश देशमुख दादा आणि वहिनी जिनिलिया देशमुख ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लवकरच लोकप्रिय शो चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी लावणार आहेत. थुकरटवाडीकरांसोबत ही जोडीसुध्दा बरीच धम्माल करणार आहेत, तेसुध्दा आपल्या मायबोली मराठीमध्ये. येत्या सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्याच्या भागांमध्ये ही मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive