By  
on  

मायलेकींच्या नात्यावर आधारित आई येतेय तुम्हाला भेटायला, भार्गवी चिरमुले दिसणार ‘या’ भूमिकेत

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने मराठी मालिका विश्व आणि सिनेमात आपला ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना असल्याचंसुध्दा तिने सिध्द केलं आहे. भार्गवी ही एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येतेय.  कलर्स मराठीवर येत्या २७ डिसेंबरपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई मायेचं कवच’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो  उलगडला. 

या प्रोमोत भार्गवी ही वर्किंग वूमन असल्याचे दिसत आहे. त्यासोबच ती आई म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. बहुधा ही एका सिंगल मदरची कहाणी असल्याची शक्यता आहे. ही कथा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

एकीकडे आई म्हणून जबाबदारी पार पाडणारी, मुलीच्या प्रती काळजी करणारी भार्गवी दिसत आहे. तर दुसरीकडे याचा गैरफायदा घेत तिची मुलगी कॉलेजमध्ये लेक्चर बंक करत पार्टी करताना पाहायला मिळतेय. त्यामुळेच आजच्या पिढीवर बेतलेली ही मालिका पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive