By  
on  

'देवमाणूस 2' च्या सेटवर सरु आजी आणि डिंपलची धम्माल, पाहा फोटो

देवमाणूस या रहस्यमय थरारक  मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाड, टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

मालिकेच्या या सिक्वलमध्ये देवमाणबूस फेम डॉ. अजितकुमार देव हा सज्जन सिंगच्या रुपात वाड्यात घुसला आहे. त्यामुळे या कथानकाला आता वेगळं वळण मिळालं आहे. 

नेहमीप्रमाणेच देवमाणूसची टीम धम्माल मस्ती करत शूटींग करतेय. नुकतंच सरु आज्जी आणि डिंपलची सीन्स दरम्याची धम्माल डिंपल फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखने सोशल मिडीयावरुन शेयर केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive